रिसर्चसाठी हवा प्रायव्हेट पार्टनरशीप बुस्टर; मेडिकल, कॉम्प्युटिंग आणि ऊर्जाक्षेत्राला फायदा

Need Private Partnership Booster for Research Which Benefits to the medical, computing and energy sectors
Need Private Partnership Booster for Research Which Benefits to the medical, computing and energy sectors
Updated on

पुणे : संशोधन आणि विकास कामांना (आर. ऍण्ड डी.) गती देण्यासाठी खासगी भागीदारीचा (पीपीपी) प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या वतीने 1.1 अब्ज डॉलरचा निधी उद्योगांसाठी उपलब्ध केल्याचे, इंडिया ब्रॅण्ड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु दीर्घकाळासाठी ही भागीदारी वाढत गेली, तरच हा संशोधनासाठी मोठा बूस्टर ठरेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लस आणि औषधे, तसेच सुपर कॉम्प्युटिंग, सौर ऊर्जा आणि इलेक्‍ट्रॉनिक हार्डवेअर संबंधीच्या संशोधन आणि विकासासाठी उद्योगांना 1.6 कोटी डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. वाढता मध्यमवर्ग आणि ग्रामीण ग्राहकांची वाढती क्रयशक्ती, यामुळे नवतंत्रज्ञानाने परिपूर्ण साधनांना मागणी वाढत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधनामध्ये गुंतवणुकीला मोठी संधी आहे. 

VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ

खासगी भागिदारीसाठी जमेच्या बाजू :  
- तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची सर्वांत मोठी बाजारपेठ 
- तंत्रकुशल मनुष्यबळाबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर 
- वाढते वैद्यकीय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र 
- वाढत्या डिजिटल पायाभूत सुविधा 
- अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत 2.48 कोटी डॉलरची तरतूद 
- उद्योगांसोबत भागिदारासाठी संशोधन संस्थांचे सहकार्य करार 
- वाढते आंतरराष्ट्रीय सहकार्य 


या क्षेत्रातील "आर ऍण्ड डी.'चा होतोय विस्तार :  
1) माहिती तंत्रज्ञान :  
- देशात सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क स्थापन 
- क्‍लाउड कंप्यूटीग, डेटा मॅनेजमेंटची, डिजीटलची वाढती बाजारपेठ 

3) औषधनिर्माण आणि वैद्यकीय :  
- जगातली तिसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय बाजारपेठ 
- कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विविध उत्पादनांची वाढती मागणी 

4) उत्पादन तंत्रज्ञान :  
- शाश्‍वत विकासासाठी उत्पादक कंपन्यांमध्ये नव संशोधनाची आवश्‍यकता 
- राष्ट्रीय उत्पादन धोरणानुसार 2025 पर्यंत 10 कोटी नोकऱ्या तयार करण्याची तयारी
 

5) अपारंपरिक ऊर्जा :  
- बायो एनर्जी प्रोग्रॅम अंतर्गत 20 टक्के खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे आव्हान 
- सौर ऊर्जा आणि जैव इंधनासाठी पूरक धोरणे 

पोलिस काढणार रेखाचित्रातून आरोपींचा माग; पाच दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात

संशोधन आणि विकासासाठी 
1) देशातील एकूण खर्च (अब्ज डॉलर)

वर्ष खर्च
2016 73.63 
2017 76.91 
2018 86.24 
2019 94.06 


2) अभियांत्रिकी आणि उत्पादनावरील खर्च (अब्ज डॉलर) 

वर्ष खर्च
2019 31.0
2022(अनुमान) 4

वार्षिक वाढीचा दर : 10.65 टक्के 

(स्त्रोत : आबीईफ माहिती तंत्रज्ञान अहवाल जून 2020) 

दहापेक्षा कमी फ्लॅट असलेल्या सोसायट्यांसाठी महत्त्वाची बातमी!


''उद्योगविश्वा समोर शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी संशोधन संस्थांबरोबरची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल. कोरोणामुळे उद्योगांसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहे. तसेच यात संधीही दडली आहे. उद्योगांच्या शाश्वत विकासासाठी संशोधनातील भागीदारी अनिवार्य आहे.''
- अरुपेंद्र मलिक, उपाध्यक्ष, टेरी कौन्सिल फॉर बिजनेस सस्टेनबिलिटी, द एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूट (टेरी)


(Edited by : Sharayu kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com