गरज पुणे महापालिकेने अर्थसंकल्पाचा फेरआढावा घेऊन पुनर्मांडणी करण्याची...

Need to reconsider the budget by the Municipal Corporation
Need to reconsider the budget by the Municipal Corporation

पुणे : कोविड-19 ने आरोग्यावर नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्थेवर ही परिणाम केला आहे. याचा विचार करून महापालिकेने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पाचा फेरआढावा घेऊन पुनर्मांडणी करण्याची गरज आहे,' अशी अपेक्षा माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी रविवारी व्यक्त केली. हा आढावा घेऊन नेमके किती उत्पन्न होईल, विकास कामांचे प्राधान्यक्रम कोणते असतील, यांची माहिती पारदर्शकपणे जनतेला सांगावे, असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सजग नागरिक मंचाच्या वतीने कोविड - 19 नंतरची परिस्थिती आणि महापालिका' या विषयावर चर्चा आयोजित केली होती. त्यामध्ये माजी प्रशासकीय आयुक्त झगडे यांनी हे अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड19 ने सर्वांवरच नव्याने विचार करण्याची वेळ आणली आहे. महापालिकेला देखील आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडण्याची, अनावश्‍यक खर्च करण्याची जी पद्धत आहे, त्यांमध्ये बदल करण्याची हीच संधी, असेही झगडे म्हणाले. 

कोरोनाच्या जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेच्या वतीने चालू वर्षीचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तो मुळात दोन हजार कोटी रुपयांनी फुगविलेला आहे. जे उत्पन्न मिळणारच नाहीये. कोविड -19 नंतर हे उत्पन्न आणखी एक ते दीड हजार कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूणच तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांनी उत्पन्न कमी होणार असल्यामुळे महापालिका आयुक्त, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी एकत्र बसून उर्वरित दहा महिन्यात किती उत्पन्न मिळेल, याचा विचार केला पाहिजे. तो विचार करून कामाचे प्राधान्य क्रम निश्‍चित करून ते जनतेला पारदर्शकपणे सांगितले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे,'' असेही झगडे म्हणाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्याच्या उपयोजनेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. यावर्षी ही तरतूद केवळ 9 लाख रुपये करण्यात आली आहे. हा "जोक' आहे, असे सांगून झगडे म्हणाले," शहरात लाउडस्पिकर लावण्यासाठी 35 लाख रुपयांची तरतूद आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास औषध खरेदीसाठी केवळ नऊ लाख तरतूद करणे म्हणजे हास्यास्पद आहे. त्यासाठी आरोग्य प्रमुख सक्षम असले पाहिजेत. अशा काळात जे प्रकल्प अथवा विकास कामे अनावश्‍यक आहेत. अशा कामांवरील तरतुदीचे वर्गीकरण करून प्रशासनाने आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. त्यास सर्व नगरसेवकांनीही विनासंकोच पाठिंबा दिला पाहिजे.'' 

पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

गेल्या चार वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यावर जी तरतूद करण्यात आली आहे. तिचे विश्‍लेषणही यावेळी झगडे यांनी केले. ते म्हणाले,"2016-17 मध्ये आरोग्य खात्यासाठी 208 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतरच्या वर्षी 215, 225 आणि चालू वर्षी ही तरतूद 263 कोटी रुपये करण्यात आली आहे. संसर्गजन्य आजाराच्या काळात सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण येतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. हे ओळखून महापालिकेने त्यांची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभारण्यासाठी खर्च करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला पाहिजे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com