समाजात लोकांना सेवा देण्याची गरज : श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी समन्वय फाउंडेशनतर्फे  सामाजिक, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पाटील यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, येरवडा कारागृहाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, अभिनेत्री मेघा घाडगे, समन्वय फाउंडेशन अध्यक्ष चांद्रजित कावडे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच लावणी या सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

समन्वय समाजभूषण पुरस्कार प्राप्त
संदिप चिंचवडे,  समाजभूषण, 
महेंद्र निंबाळकर, आरोग्य समाजभूषण, 
शैलेंद्र बेल्हेकर, समाज जागृती गौरव, 
कांचन सरोदे,  वीर पत्नी गौरव, 
शामकांत काळे, उद्योजक गौरव, 
शरद बालवडकर,  शिक्षण भूषण, 
आराधना फाऊंडेशनला समाज कार्यगौरव, विजय गायकवाड, उद्योजक गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to serve people in the society: Srinivas Patil