esakal | जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी अभ्यासाची गरज; डॉ. वार्ष्णेय
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी अभ्यासाची गरज; डॉ. वार्ष्णेय

जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी अभ्यासाची गरज; डॉ. वार्ष्णेय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण, वृक्षतोड, वणवा, औष्णिक विद्युत केंद्र अशा विविध कारणांमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीचा भविष्यातील धोका लक्षात घेता तापमान वाढ रोखण्यासाठी  प्रयत्न होणे गरजेचे आहे." असे मत गुजरात येथील आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी व्यक्त केले.

शिवाजीनगर येथील कृषी विद्यापीठात आयोजित ऑनलाइन शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या प्रसंगी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार आदी उपस्थित होते. यावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. चोरडिया यांची सेंटर फोर एज्युकेशन, रिसर्च ॲण्ड ग्रोथच्या (सीईजीआर) उपाध्यक्षपदी निवड, तर डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. वार्ष्णेय यांनी बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये विविध पिकांच्या मॉडेल्सवर अभ्यास होणे महत्त्वाचे असून त्यानुसार पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

डॉ. चोरडिया म्हणाले, ‘‘कृषी शिक्षण देताना पदवीधारकांना अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी कृषी स्टार्टअप प्रकल्प देणे, कृषी आधारित यशस्वी उद्योगांचा त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे अशा विविध गोष्टी गरजेचे आहे.’’ जगभरात हवामान बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असून त्यावर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्‍यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top