esakal | तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा !
sakal

बोलून बातमी शोधा

Need urgent rickshaw Then Contact on this mobile number

पुणेकरांनो तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीसाठी जर रिक्षा हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने ती व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. शहरामध्ये 180 रिक्षा त्यासाठी निवडण्यात आल्या आहेत.

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीसाठी जर रिक्षा हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने ती व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. शहरामध्ये 180 रिक्षा त्यासाठी निवडण्यात आल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेडिकल इमर्जन्सी असेल तर नागरिकांनी *98591 98591 या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना या रिक्षा उपलब्ध होतील.  त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी रिक्षा हवी असेल तर रिक्षा उपलब्ध होईल त्यासाठी मीटरने पैसे घेतले जातील. शहरात सध्या 180 रिक्षा या प्रकारे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, ऑटो ग्लाइड, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि बाबा शिंदे यांच्यातर्फे हा उपक्रम राबविला जात असल्याची  माहिती राहुल शितोळे यांनी दिली.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षांसाठी मंगळवारी दिवसभरात साडेतीन हजार पुणेकरांनी संपर्क साधला होता, त्यातील बहुतेक जणांना विमानतळावर जायचे होते. बुधवारपासून विमान सेवा बंद झाली आहे. बुधवारी सुमारे एक हजार नागरिकांनी फोन केला होता. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरकडे जायचे होते. त्यापैकी अनेक जणांना या रिक्षा उपलब्ध झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक रिक्षामध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे एका रिक्षामध्ये दोनपेक्षा जास्त प्रवासी नसतील, याची काळजी घेऊन त्या मार्गावर सोडल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रवाशांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही शितोळे सांगितले

loading image
go to top