
सतार हे वाद्य अनेक वर्षांपासून विकसित होत आले आहे. प्रत्येक काळात या वाद्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भावना पोहोचवल्या. ही केवळ त्या वाद्याची किमया नव्हती; तर या वाद्यावर प्रभुत्व मिळविलेल्या वादकांची किमया होती. प्रत्येक वादक ती किमया अवगत करण्याचा प्रयत्न करत असतो. ही प्रक्रिया निरंतर सुरू असते, असे प्रसिद्ध वादक नीलाद्री कुमार यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांच्याशी बोलताना सांगितले. नीलाद्री कुमार आज (ता. ६) सायंकाळी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमात आपले वादन सादर करणार आहेत.