
पुणे : ‘‘गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. मात्र, सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. त्यातून आपल्या संस्कृतीची ओळख पटते. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल, असे प्रतिपादन स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.