
गुळुंचे : नीरा शिवतक्रार (ता. पुरंदर) येथे अकबर सय्यद यांचे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण गुरुवारी (ता. ३) पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर, तसेच पोलिसांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. साडेतीन तास नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुरंदरच्या ‘बीडीओं’ना घाम फुटला, तर ग्रामसेवक व उपसरपंचांना समाधानकारक माहिती देता न आल्याचे दिसून आले. या वेळी बाचाबाचीदेखील झाली. अखेर निर्णायक पावले उचलण्यात आल्याने काही प्रश्नांचा तिढा तात्पुरता सुटला आहे.