NEET UG Exam Result : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचे सत्र कायम; पुण्यातील विद्यार्थ्याला ७०७ ऐवजी मिळाले २१७ गुण

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट-युजी’ या प्रवेश परीक्षेतील गोंधळाचे सत्र अद्यापही कायम आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याला ७२० पैकी उत्तरपत्रिकेनुसार ७०७ गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र.....
NEET Exam

NEET Exam

Esakal
Updated on

पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट-युजी’ या प्रवेश परीक्षेतील गोंधळाचे सत्र अद्यापही कायम आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याला ७२० पैकी उत्तरपत्रिकेनुसार ७०७ गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, स्कोअरकार्डवर त्याचे केवळ २१७ गुण दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी- पालकांना पुन्हा एकदा मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. निकालातील गुणांच्या गोंधळाबाबत पालक आता थेट न्यायालयातच धाव घेण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com