पुणे - आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेवत, डॉक्टर होण्याचे स्वप्नं उराशी बाळगत वंचित घटकातील ‘त्या’ विद्यार्थ्यांनी केवळ मेहनतीच्या बळावर अवघड अशा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेल्या ‘नीट’ परीक्षेत यश मिळविले आहे..कोणत्याही विशेष सुविधा नसतानाही केवळ जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर ‘त्या’ विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याच्या प्रवासातील प्रवेश परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे..पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (एलएफयू) या स्वयंसेवी संस्थेतर्फे नीट या प्रवेश परीक्षेचे विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश मिळविले आहेत. ‘पीएमटी बस’च्या वाहक आणि एकल पालक असणाऱ्या रूपाली धापटे यांचा मुलगा सिद्धेश याला ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी ५०४ गुण मिळाले आहेत..तो म्हणाला, ‘समाजाची सेवा करण्यासाठी मी मदतगार डॉक्टर बनू इच्छितो. गेल्या वर्षी देखील ‘नीट’ परीक्षा दिली होती. परंतु, त्यावेळी इतके गुण मिळाले नव्हते. यंदा पुन्हा पर्यंत केला आणि ५०४ गुण मिळाले.’.तर आदिती जाधव हिला ४३२ गुण मिळाले आहेत. ती म्हणते,‘‘एप्रिल २०२३मध्ये आजोबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आम्ही त्यांना वेळेवर रुग्णालयात नेले असते, तर आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. या घटनेने मला डॉक्टर होण्यास प्रवृत्त केले. आठ तास स्व अभ्यास आणि दररोज चार तास एलएफयुमध्ये अभ्यास केला.’.टेम्पो ड्रायव्हर असणाऱ्या युवराज आडे यांची मुलगी पुनम हिला ‘नीट’मध्ये ४११ गुण मिळाले आहेत. तर, कपडे विक्रेत्यांची मुलगी असणारी नैनाकुमारी साव हिला ५०२ गुण मिळाले आहेत. ती म्हणते, ‘आमच्या गावात डॉक्टर नाहीत, म्हणून अनेकदा लोक आजारी पडतात आणि त्यांना कोणताही उपचार घेता येत नाही. म्हणून मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.