मनिषा हवालदारने शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट आउट; NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा!

CBI Reveals Pune School Principal Printed NEET-UG 2026 Physics Questions from School Computer : शाळेतील प्रिंटरवरून अतिगोपनीय प्रश्नपत्रिका बाहेर; मनिषा हवालदार अटकेत, पालकांकडून NTAच्या निवड प्रक्रियेवर आणि परीक्षेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न
NEET-UG 2026 Paper Leak: Pune School Principal Arrested by CBI in Physics Question Printout Scam

NEET-UG 2026 Paper Leak: Pune School Principal Arrested by CBI in Physics Question Printout Scam

esakal

Updated on

पुणे: देशभरात खळबळ माजवणाऱ्या NEET-UG २०२६ परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या भूमिकेचा धक्कादायक खुलासा झाला आहे. शेठ हिरालाल सराफ प्रशाला, बुधवार पेठ येथील मुख्याध्यापिका मनिषा संजय हवालदार (५८) यांनी शाळेतील प्रिंटरवरूनच अतिगोपनीय प्रश्नपत्रिकेचे प्रिंट आउट काढल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) ने शुक्रवारी त्यांना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com