

नीटप्रकरणी
रिपाइंचे निवेदन
सातारा, ता. १८ : नीट यूजी २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे दोन्ही मंत्र्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नीट यूजी परीक्षा पेपरफुटीमुळे देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बीड, पुणे, नांदेडसह विविध ठिकाणांहून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याने सरकारने विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
…………...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.