'निगेटिव्ह आयन' कोरोनाचे विषाणू हटवतो; डॉ. जगदाळे यांचा दावा

dr. rajendra jagdale
dr. rajendra jagdale
Updated on

पुणे - निगेटिव्ह आयनच्या वापरातून पृष्ठभागावरील कवके, जिवाणू आणि विषाणू हटवता येतात. निर्जंतुकीकरणाच्या या पद्धतीद्वारे कोरोनाचा विषाणूही हटवला जातो. त्यासाठी आम्ही किफायतशीर किमतीत संयंत्रही तयार केले आहे, अशी माहिती सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी दिली.

पार्कच्या वतीने 'सायटेक एरॉन आयोनायझर मशीन' तयार करण्यात आले आहे. संयंत्रातून शंभर दशलक्ष निगेटिव्ह आयन प्रति सेकंदाला तयार होत असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, "जगभरामध्ये निगेटिव्ह आयनवर संशोधन करण्यात आले आहे. संयंत्रातून तयार झालेला हायड्रोक्सिल ग्रुप विषाणूच्या प्रथिन रचनेशी अभिक्रिया करतो आणि त्याची वाढ थांबवतो किंवा त्याला नष्ट करतो. याद्वारे कोरोना विषाणू हटवणेही शक्य आहे. पार्कच्या संशोधकांनी किफायतशीर किमतीत निगेटिव्ह आयन जनरेटर तयार केले असून, नायडू रुग्णालयातही ते लावण्यात आले आहे."

निगेटिव्ह आयन जनरेटरच्या वापरातून एका तासात खोलीचे ९९ टक्के निर्जंतुकीकरण होत असल्याचा दावा संशोधकांच्या वतीने करण्यात आला आहे. विषाणूंचा संसर्ग झालेल्या भागात किंवा रुग्णालयांत निर्जंतुकीकरणासाठी या संयंत्राचा वापर करण्यात येऊ शकतो. यामुळे रुग्णाबरोबरच डॉक्टर, परिचारिका, निकटवर्तीय आदींना संसर्गापासून वाचवता येऊ शकते. 

संयंत्राची प्रत्यक्ष विषाणूवर चाचणी घेण्यासाठी अतिउच्च दर्जाच्या प्रयोगशाळा लागतात. आपल्याकडे त्याची उपलब्धता नसल्याने संयंत्रातून निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह आयनच्या संख्येवरून आणि जगभरातील शोध पत्रिकांतून आम्ही त्याचा परिणाम निश्चित केला आहे.
- डॉ. राजेंद्र जगदाळे, संचालक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com