

Pune Crime
esakal
लोणी काळभोर: रिक्षाने देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर शेजारी राहणाऱ्या महिलेने अचानक हल्ला केल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात गुरुवारी ७ मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मी संतोष बावणे (रा. रॉयल लॉन्स परिसर, कुंजीरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशा पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.