

प्रशासनाचा ३३८ जणांशी संपर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्टला अचानक आलेल्या पुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील ४०४ पर्यटकांपैकी ३३८ जणांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून, ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ३७ जणांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईस्थित ‘रिचा टूर्स’मार्फत नेपाळला गेलेले साठ पर्यटक मात्र अद्याप बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने चीन-तिबेट परिसरात सुरक्षित असलेल्या महाराष्ट्रातील १४९ नागरिकांची यादी राज्य सरकारला देण्यात आली आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून नागरिकांची ओळख व स्थिती पडताळली जात आहे. नागपूरमधील १०५ नागरिक मायदेशी परतले आहेत दरम्यान, मुंबईतील बोरिवली आणि अंधेरी येथील आठ पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरीतील लक्ष्मीनारायण आचार्य आणि त्यांच्या गटाचा मोबाइलवरून संपर्क होत नसल्याने प्रशासन त्यांच्या नातेवाइकांच्या संपर्कात आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील ट्रॅव्हल्सद्वारे नेपाळला गेलेल्या महाराष्ट्रातील ४५ जणांच्या गटाने शनिवारी भारतीय हद्दीत प्रवेश केला. चितवन येथे अडकलेल्या या गटाला लुंबिनीमार्गे भारतात आणण्यात आले असून, ते अयोध्येत पोहोचले आहेत. पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.