
पुणे : शहरात विविध कारणांनी होणारे आत्महत्येचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी सकाळी रास्ता पेठेत एका नेपाळी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पतीने गळफास घेतल्याचे पाहुन पत्नीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यात आत्महत्येचे सत्र सुुरुच
सुरज सोनी(27,रा.पदमजी पार्क, विश्राम सोसायटी, रास्ता पेठ), अरुणा सुरज सोनी( 22) असे आत्महत्या केलेल्या दांम्पत्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच सुखसागर येथे दाम्पत्याने आपल्या मुलाना गळफास देऊन स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच दिवशी धायरी येथेही एकाने आत्महत्या केली. तर शनिवारी सहकारनगर येथे एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटना ताज्या असतानाच रविवारी सकाळी एका दाम्पत्यनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी येऊन धडकली.
- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?
घरगुती वादामुळे पतीने घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोनी ही व्यक्ती चार महिन्यापूर्वीच रास्ता पेठेतील एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. तो सोसायटीच्या आवारातीलच एका खोलीत पत्नी अरुणा व त्याच्या मेव्हण्यासोबत रहात होता. शनिवारी रात्री सुरज आतल्या खोलीत एकटा झोपला होता. तर पत्नी अरुणा व तीचा भाऊ खोली बाहेर झोपले होते. रविवारी सकाळी तिच्या भावाने झोपेतुन उठल्यानंतर खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता सुरजने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तत्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
पतीने आत्महत्या केल्याचे पाहुन पत्नीनेही घेतला गळफास
यानंतर तो या घटनेची माहिती देण्यासाठी पूलेगट पोलिस चौकीत गेले, त्यावेळी अरुणा घरी होती. सुरजचा भाऊ व मेव्हणा माघारी परतले तेव्हा अरुणानेही गळफास घेतलेल्याचे आढळले. दोघांनीही ओढणीने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला होता.
आत्महत्या का घडतात? काय आहेत करणे वाचा सविस्तर
या घटनेची माहिती मिळताच समर्थपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघानीही खोलीतील पत्र्याच्या एकाच हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह खाली काढून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.