esakal | आंबेगाव तालुक्यात आज 22 नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यात आज 22 नवे पॉझिटिव्ह

आंबेगाव तालुक्यात गुरुवारी (ता. 20) 22 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले.

आंबेगाव तालुक्यात आज 22 नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात गुरुवारी (ता. 20) 22 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 628 झाली आहे. वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे ग्रामस्थ व प्रशासन चिंतेत पडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मंचरला सर्वाधिक 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रानमळा तीन, लांडेवाडी दोन, घोडेगाव, कानसे, गिरवली, महाळुंगे पडवळ, शेवाळवाडी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. पॉझिटिव्ह वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने कोविड बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका मोटरसायकलवर तीन जण बसलेले पाहावयास मिळतात. मास्कचा वापर न करणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. ग्रामपंचायत व पोलिस यंत्रणेने एकत्रितपणे कारवाई करून दंड वसुली करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

loading image
go to top