पीएमपीच्या ताफ्यात नवीन चाळीस बस दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पीएमपीच्या ताफ्यात नव्या चाळीस बस दाखल झाल्या असून, पुढील आठवड्यापासून त्या रस्त्यावर धावतील. निगडी डेपोमध्ये कार्यान्वित होणाऱ्या या बसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

पिंपरी - पीएमपीच्या ताफ्यात नव्या चाळीस बस दाखल झाल्या असून, पुढील आठवड्यापासून त्या रस्त्यावर धावतील. निगडी डेपोमध्ये कार्यान्वित होणाऱ्या या बसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बसला लागलेली आग रोखण्यासाठी या नवीन बसमध्ये आग विझवणारी आधुनिक यंत्रणा बसवली आहे. बसमध्ये कुठेही आग लागल्यास ती विझविण्याचे काम ही यंत्रणा तत्काळ करेल. या शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सिटला सीट बेल्ट बसविले आहेत.

प्रवासादरम्यान प्रवाशांना अचानक काही त्रास होऊ लागल्यास त्यासाठी पॅनिक बटणाची सुविधा बसमध्ये दिली आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर त्याची माहिती बसचालकाला मिळणार आहे. तसेच, सुरक्षेसाठी बसमध्ये तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, त्याद्‌वारे बसमधील हालचालींवर नजर ठेवता येईल. सीसीटीव्हीमधील रेकॉर्डिंग सात दिवस ठेवता येणार असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नव्याने दाखल होणाऱ्या बसमुळे वारंवारिता वाढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 40 Bus Involve in PMP