Maharashtra CET : सीईटीच्या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष; विविध राजकीय पक्षांकडून प्रक्रिया बदलण्याची आग्रही मागणी
Student Outrage : नव्या सीईटी प्रवेश अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयातून वंचित राहावे लागणार असून, या अटींमध्ये बदल करण्याची विद्यार्थ्यांकडून जोरदार मागणी होत आहे.
पुणे : राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत या वर्षीपासून लागू केलेल्या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.