Pune News : पश्चिम घाटात वाघपतंगाच्या नविन वंश अन् प्रजातीचा शोध; पुण्यातील शास्त्रज्ञांची महत्त्वपूर्ण कामगिरी

जैवविविधतेचा खजिना मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाटात वाघपतंगाच्या (टायगर मॉथ) नव्या वंशासह नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.
Tiger Moth Discovered

Tiger Moth Discovered

sakal

Updated on

पुणे - जैवविविधतेचा खजिना मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाटात वाघपतंगाच्या (टायगर मॉथ) नव्या वंशासह नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (झेडएसआय) पुणे येथील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय पथकाने केरळच्या इडुक्की जिल्ह्यात हा शोध लावला आहे. ‘अंतरम् इडुक्की’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. हा शोध पश्चिम घाटातील अद्याप नोंद न झालेल्या कीटकवैविध्याचा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, अज्ञात उत्क्रांती शाखेवरही प्रकाश टाकणारा आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com