vikas karvande
sakal
खडकवासला - 'उत्तुंग इच्छाशक्तीपुढे आकाशही ठेंगणे!' याचा प्रत्यय सिंहगडावर आला, जेव्हा ८४ वर्षीय मावळा विकास करवंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्वत जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तब्बल १७०६ वी सिंहगड वारी पूर्ण करून त्यांनी आत्मविश्वास आणि जिद्दीचा नवा इतिहास रचला. त्यांच्या या अदम्य ध्येयपूर्तीच्या क्षणी सिंहगडही कारवी, तेरडा आणि सोनकीच्या रानफुलांनी फुलून स्वागताला उभा होता.