साताऱ्याजवळ साकारणार लवकरच न्यू महाबळेश्‍वर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पर्यावरणाला धोका न पोचता विकास
शहराची निर्मिती करताना पर्यटनाला अधिकाधिक चालना कशी मिळेल, याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. त्या परिसरातील वन्यजीव, कास पठार आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या इतर स्थळांना कोणताही धोका पोचणार नाही, याची काळजी घेऊनच या शहराचे नियोजन करण्यात येणार आहे.

पुणे - महाबळेश्‍वरशेजारी ‘न्यू महाबळेश्‍वर’ वसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. महामंडळाने या कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण आणि सातारालगतच्या गावांतील जागेवर हे न्यू महाबळेश्‍वर वसविण्याची योजना आहे. पर्यावरणाला बाधा येऊ नये, यासाठी सात अटींवर महामंडळाला हे शहर वसविण्याची परवानगी दिली आहे.
महाबळेश्‍वर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. पर्यटनवाढीसाठी आणखी वाव आहे. त्याला चालना देण्यासाठी न्यू महाबळेश्‍वर वसविण्यात येणार आहे, असे ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

असे असेल शहर
एकूण क्षेत्र ३७,२५८ हेक्‍टर
गावे ५२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Mahabaleshwar near to satara