

Maharashtra MIDC Expansion Planned In Pawan Maval With 1100 Acres Proposed In Baur Karunj And Brahmanwadi Villages
sakal
तळेगाव दाभाडे : चाकण औद्योगिक वसाहतीवर वाढत असलेले उद्योगधंदे आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पवन मावळातील तीन गावांमध्ये नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बऊर, करुंज आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये सुमारे ११०० एकर क्षेत्रावर हे औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित असून, त्याचे प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूसंपादन आणि जमिनीच्या दर निश्चितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.