
माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) ‘६४ केबी ईसीएचएस कार्ड’च्या सुरक्षित परताव्यासाठी नवे आदेश दिले.
‘ईसीएचएस कार्ड’ परताव्यासाठी नवे आदेश
पुणे - माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाने (ईसीएचएस) ‘६४ केबी ईसीएचएस कार्ड’च्या सुरक्षित परताव्यासाठी नवे आदेश दिले आहेत. लष्करातून निवृत्त होऊन पुन्हा सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या माजी सैनिकांनी या योजनेतून बाहेर पडताना ‘ईसीएचएस कार्ड’ पुन्हा विभागाला देणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुरक्षित हस्तांतर प्रकियेनुसार (सेफ कस्टडी) हे कार्ड ‘ब्लॉक’ करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.
कुणाला होतो फायदा
विभागाकडून माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबांसाठी विविध आरोग्य योजना राबविण्यात येतात. यासाठी काही वर्षांपासून लाभार्थ्यांना ईसीचएस कार्ड घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेकदा माजी सैनिक निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करतात. अशावेळी त्यांना संबंधित शासकीय किंवा खासगी संस्थांकडून वैद्यकीय सुविधा घेता येतात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांना ईसीएचएस सेवा योजनेतून बाहेर पडावे लागते. ही सेवा बंद करताना त्यांनी कार्ड विभागाकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता हे कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतर (ब्लॉक) करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, भविष्यात माजी सैनिकांना हे कार्ड पुन्हा अनब्लॉकही करता येतील. त्यासाठी देखील ऑनलाइन प्रक्रिया देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - www.echs.gov.in
कार्ड हस्तांतर प्रक्रिया
ईसीएचएस पॉलिक्सिनिकच्या प्रादेशिक केंद्राला भेट देत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे
प्रादेशिक केंद्रामध्ये सुरक्षित हस्तांतर प्रक्रियेला चालना
कार्ड नंबर/सेवा क्रमांक पुरविणे आवश्यक व इतर माहिती तपासली जाणार
ईसीएचएस कार्ड ‘ब्लॉक’ केले जाणार
पोचपावतीचा वापर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) म्हणून नव्या संस्थेत करता येणार
Web Title: New Orders For Echs Card Refund
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..