Lockdown : विनाकारण रस्त्यावर फिरताय? सावधान, आता ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिस ठेवतायेत लक्ष

New Police taking action using drones against citizen wandering outside home during lockdown
New Police taking action using drones against citizen wandering outside home during lockdown

पुणे : कोरोनामुळे शहरात संचारबंदीचा आदेश असल्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही काही नागरीक विनाकारण शहरामध्ये फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.आता शहरात विनाकारण फिरणाऱ्या  नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला जात असून त्यामध्ये दिसणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी ९ मार्चपासून जिल्हा, आरोग्य, महापालिका व पोलिस प्रशासन एकत्रित काम करीत आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून  नागरिकांनी विनाकारण शहरामध्ये फिरू नये यासाठी पोलिसांकडून शहरात १८० हून अधिक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना शहरामध्ये न फिरण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. विशेषत: पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त नागरिकांवर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे असूनही नागरीक सर्रासपणे शहरामध्ये फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

सर्दी,खोकल्यापासून "फेस शिल्ड'द्वारे बचाव 
दरम्यान, ही बाब गांभीर्याने घेऊन पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचा ड्रोन द्वारे शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करून टेहळणी केली जाणार आहे. त्यामध्ये सापडणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत

Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद
शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा येणाऱ्या परिमंडळ एकमध्ये सोमवारी ड्रोनचा वापर करून टेहळणी करण्यात आली. तर मंगळवारी येरवडा, औंध, बाणेर, वडगावशेरी हा परिसर असणाऱ्या परिमंडळ ४, हडपसर, वानवडी, कोंढवा परिसर असलेल्या परिमंडळ ५ या परिसरामध्ये ड्रोनचा  वापर करून टेहळणी करण्यात आली. त्यामध्ये निदर्शनास आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

"संचारबंदी असतानाही नागरीक रस्त्यावर फिरत आहेत.त्यांना अटकाव करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. ड्रोन फिरत असताना त्यामध्ये निदर्शनास येणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. परिमंडळ १, ४ व ५ मध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला आहे."
- डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com