
Hinjewadi Traffic
Sakal
पिंपरी : हिंजवडीतील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडीमुक्तीसाठी शासनाच्या वतीने पावले टाकली जात आहेत. या परिसरातील प्रस्तावित नव्या रस्त्यांसाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून पाठविण्यात आला असून त्यानंतर पीएमआरडीएकडून या रस्त्याच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही होणार आहे.