
Maharashtra ITI
Sakal
पुणे : तुमचे दहावी-बारावी किंवा पदविका शिक्षण झाले असेल किंवा तुम्ही आयटीआयचे प्रशिक्षणार्थी असाल, किंवा तुम्ही गृहिणी असाल, तरीही तुम्हाला तुमच्या जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अल्प मुदत अभ्यासक्रम करता येणार आहेत. होय, विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळावे आणि रोजगार क्षमता वाढावी, यासाठी राज्यातील सर्व ‘आयटीआय’मध्ये अल्प मुदतीत नवीन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.