आता फसवणुकीचा नवा फंडा!

मोबाईल स्क्रीनशॉट
new style of fraud mobile screen shot  Online payment scanning the QR code pune
new style of fraud mobile screen shot Online payment scanning the QR code pune sakal

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील विजय गर्जे (नाव बदललेले आहे) यांच्या दुकानामध्ये एक ग्राहक सातत्याने मोजक्‍याच वस्तू घेत असे. त्या वस्तूंचे बिल ग्राहक कायम त्याच्या मोबाईलवरून दुकानदाराकडील क्‍यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन करीत असे. बिल दिल्याचा मोबाईलवरील स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवून तो निघून जात असे. रात्री हिशोब करताना मात्र त्या ग्राहकाचे बिल जमा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तो ग्राहक पुन्हा त्यांच्या दुकानाकडे फिरकलाच नाही, अशा पद्धतीने सध्या बनावट मोबाईल स्क्रीनशॉटचा वापर करून छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिकांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. विशेषतः बनावट मोबाईल स्क्रीनशॉट तयार करून त्याद्वारे गंभीर गुन्हे करण्याच्याही काही घटना घडत असल्याची सद्यःस्थिती आहे.

गंभीर गुन्ह्यातही होतोय ‘स्क्रीनशॉट’चा वापर

काही व्यक्तींकडून विविध मोबाईल ॲपचा वापर करून बनावट स्क्रिनशॉट तयार केले जातात. त्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण, खासगी चॅटिंग, अश्लील मेसेज पाठविल्याचे दाखविले जाते. त्यानंतर हेच स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून नागरीकांना ब्लॅकमेल केले जाते. तसेच पैसेही उकळले जातात. या गंभीर प्रकाराचा राजकीय, प्रशासकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना फटका बसत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर होत आहे. त्याचबरोबर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

मोबाईलचे स्क्रीनशॉट काढून ब्लॅकमेल करणे, धमकाविणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्यानंतर ऑनलाइन पैसे दिल्याचा स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही आमच्याकडे दाखल आहेत.

- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

काही वर्षांपासून ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. त्यातूनच मोबाईलचा स्क्रिनशॉट दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडतात. मात्र, आमचे व्यावसायिकही आता हे प्रकार टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेत आहेत.

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंटस्‌ अॅण्ड हॉटेलिअर्स असोसिएशन

इथे साधा संपर्क

  • सायबर पोलिस व्हॉटस्‌अॅप क्रमांक ः ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५

  • सायबर पोलिस ठाणे ः ०२०-२९७१००९७

  • ई-मेल - crimecyber.pune@nic.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com