
पुणे : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यात फक्त समाविष्ट गावांचा हद्दी जोडलेले तीन प्रभाग तयार झाले आहेत. तर उर्वरित तीन प्रभागात जुन्या आणि नव्या हद्दीचा समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या समाविष्ट गावातून १८ ते १९ नगरसेवक निवडून जाऊ शकतात. मात्र, या समाविष्ट गावांचे प्रभाग तयार करताना जुन्या हद्दीतील काही प्रभाग गायब झाले असल्याने माजी नगरसेवकांना आता योग्य प्रभागांची शोधाशोध करावी लागणार आहे.