

purandar airport plan
Sakal
पुणे - पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाचा एकरी दर वाढवून देणे, मोबदल्याच्या स्वरूपात दहा टक्क्यांऐवजी वाढीव जमीन आणि विमानतळ कंपनीत शेतकऱ्यांना भागीदारी देण्यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे नवीन वर्षात विमानतळासाठी प्रत्यक्षात भूसंपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.