पुण्यात पुन्हा नवजात अर्भक सापडलले कचरा कुंडीत!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

पिंपरी चिंचवडमधील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना कचराकुंडीत हंबरडा फोडत बाळ रडताना दिसले.

पिंपरी चिंचवड : नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिचवड परिसरात ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे नवजात अर्भक स्त्री जातीचे असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवडमधील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना कचराकुंडीत हंबरडा फोडत बाळ रडताना दिसले. पहाटेच्या थंडीत कुडकुडाणाऱ्या बाळाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. बाळाची नाळ ठेचून तोड्ल्यामुळे होणाऱ्या वेदनेमध्ये ते विव्हळत होते. हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ ही बाब स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना कळवली. बाळाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून सध्या पिंपरीतील जीजामाता रुग्णालयात उपाचार सुरु केले आहेत. तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास  वाकड पोलिस करत आहेत.

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

दरम्यान, नवजात अर्भकाला सोडून दिल्याच्या घटना पुण्यात वारंवार निदर्शनास येत आहेत. काही दिवसांपुर्वीच चांदणी चौकातून कोथरुडकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजुला 4 महिन्याते स्त्री जातीचे बाळ अज्ञात व्यक्तीकडून सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या बाळाला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात असून त्याच्या आईवडीलांचा  शोध सुरु आहे.  

कोरोना काळात १० लाख कुटुंबांना केली मदत - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn baby found in garbage bin again in Pune