कात्रजच्या तलावात उडी मारून नव्या नवरीने तीन महिन्यांतच केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

सासरच्या सतत चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने विवाहितेने कात्रज तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच विवाहितेने जीवन संपविले आहे. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - सासरच्या सतत चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने विवाहितेने कात्रज तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच विवाहितेने जीवन संपविले आहे. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पती मंगेश महादेव साळुंखे, सासू संगीता महादेव साळुंखे आणि नणंद प्रियांका महादेव साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अंजली मंगेश साळुंखे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नथू मारुती भोसले (वय 46, रा. मांगडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि अंजलीचे जून 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासू संगीता, नणंद प्रियांका आणि पती मंगेश अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. तिघांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाणही केली. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून अंजली यांनी 25 सप्टेंबरला कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly married girl suicide doubt over character