वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

राजकुमार थोरात
Thursday, 8 October 2020

सपना हिने साखर कारखान्यामध्ये महिला कामगार कल्याण अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला आहे.

वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते सुरेश ढगे यांची कन्या सपना ढगे कामगार कल्याण अधिकारी म्हणून शुक्रवार (ता. ९) रोजी पदभार स्विकारत आहे. सपना हिने साखर कारखान्यामध्ये महिला कामगार कल्याण अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला असून कोरोना महामारीच्या लॉकडाउनमुळे गेलेली नोकरी गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा मिळल्याचा आनंद सपनाच्या गगनात मावेनासा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

स्पर्धेच्या युगामध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांचा टक्का वाढत आहेत. भवानीनगर व सणसर परीसरामध्ये गेल्या ३० वर्षापासून नागरिकांच्या घरोघरी नियमित वृत्तपत्र पोहचविण्याचे काम करणारे सुरेश ढगे यांची सपना ढगे ही एकुलती एक कन्या.

सपनाचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये झाल्यानंतर आठवीच्या पुढील शिक्षण शिर्डी जवळील प्रवरामध्ये झाले. मनुष्यबळ विभागमध्ये मास्टर डिग्रीचा आभ्यासक्रम पुर्ण झाला आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये कार्यरत होती. काेरोना महामारी व लॉकडाउनचा फटका सपनाला बसला. तिच्यावर नोकरी गमविण्याची वेळ आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अचानक हातातील काम गेल्यामुळे सपना चिंतेमध्ये पडली होती. काही दिवसापूर्वीच छत्रपती कारखान्यामध्ये कामगार कल्याण अधिकारी पदासाची जाहिरात आल्यानंतर अर्ज केला. मात्र पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये काम करावे की नको असा विचार मनामध्ये घुटमुळत असताना वडिल सुरेश व आई विद्या यांनी सपनाला धीर दिला. मुखालतीमध्ये सपनाचा कामगार कायद्यामधील आभ्यास व  कामगारांच्या कल्याणासाठी काम करण्याची तळमळ पाहून साखर आयुक्त कार्यालयाने कामगार कल्याण अधिकारी या पदावरती काम करण्याची संधी दिली. साखर कारखान्यामध्ये  कामगार कल्याण अधिकारी काम करणारी मी पहिली महिला अधिकारी असल्याचे सपनाने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आई-वडिलांनी दिला धीर...
लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. आईवडिलांनी धीर देवून कारखान्यामध्ये नोकरीचा अर्ज करण्याचे पाठबळ दिल्यामुळे आज छत्रपती कारखान्यामध्ये कामगार कल्याण अधिकारी म्हणून काम पाहण्यास सुरवात करणार असून कामगारासाठी कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The newspaper vendor's daughter Sapna became a sugar factory worker welfare officer