
पुणे - वृत्तपत्र विक्रेते महेंद्र बेंद्रे यांच्या निरंतर कष्टांना अखेर यश आले आहे. बिकट परिस्थितीवर मात करत त्यांचा मुलगा प्रथमेश (वय २५) याने सनदी लेखपाल (सीए) परीक्षेत यश मिळविले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (आयसीआयए) यांनी हा निकाल नुकताच जाहीर केला. प्रथमेशचे वडील वृत्तपत्र विक्रेते आणि रिक्षाचालक असून, आपल्या मुलाला सीए करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.