पुण्यात आज बरसल्या पावसाच्या सरी; येत्या चार दिवसांत पावसाचा जोर होणार कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

येत्या चार दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार असून 12 ते 13 जुलै दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच शहर व परिसरातील सर्व भागांमध्ये दिवसभर पावसाच्या सरी पडतील, असे हवामानशास्त्रज्ञ अनुपम काशयपी यांनी सांगितले.

पुणे : शहर आणि परिसरात आज (मंगळवारी) बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. दरम्यान काही ठिकाणी वाऱ्यांचा वेगही वाढले होते. तर येत्या तीन चार दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती शिवाजीनगर वेधशाळे मार्फत देण्यात आली.

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

येत्या चार दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार असून 12 ते 13 जुलै दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच शहर व परिसरातील सर्व भागांमध्ये दिवसभर पावसाच्या सरी पडतील, असे हवामानशास्त्रज्ञ अनुपम काशयपी यांनी सांगितले. तसेच भारतीय हवामान विभागा (आयएमडी) तर्फे मंगळवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये शिवाजीनगर येथे 6.9 मिलिमीटर पावसाची तर पाषाण येथे 6.4 मिलिमीटर तर लोहगाव येथे 7.3 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयआयटीएम) माहितीनुसार आज सकाळी पासून आतापर्यंत 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मंगळवारी सकाळ पासूनच पावसाने शहर आणि परिसरातील उपनागरांसह विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर कोंढवे धावडे परिसरात काही काळ सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडला. सध्या शहरात पावसाची रिमझिम सुरूच आहे

.- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पश्चिमी दिशेने वाहणारे वारे सध्या अरबी समुद्रावर आहेत. या वाऱ्यांमध्ये काही प्रमाणात आद्रता असल्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याचेही काश्यपी यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The next four days will be less rainy in pune