‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ प्रदर्शन शुक्रवारपासून

‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ 
प्रदर्शन शुक्रवारपासून
Published on

पुणे, ता. २१ ः ‘अस्पायर नॉलेज अँड स्किल्स’, ‘संवाद, पुणे’ आणि ‘हाऊस ऑफ सक्सेस’ यांच्यातर्फे शुक्रवार (ता. २४) ते रविवार (ता. २६) या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि भावार्थ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनात तज्ज्ञांची व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत.
‘अस्पायर नॉलेज अँड स्किल्स’चे संजय गांधी, ‘संवाद’चे सुनील महाजन आणि ‘हाऊस ऑफ सक्सेस’चे प्रसाद मिरासदार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे इनोव्हेशन ऑफिसर अजिंक्य तेरकर, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, ‘भावार्थ’च्या व्यवस्थापक कीर्ती जोशी आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, डोमेस्टिक वर्कर्स सेक्टर स्किल कौन्सिलच्या सीईओ मोना गुप्ता उपस्थित असतील. प्रदर्शनात ‘हटके करियर : युट्यूबर्स आणि इन्फ्लुएंसर्सचे‌’, ‌‘करियर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‌’, ‌‌‘माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील करियर संधी‌’, ‘‌इंटरनॅशनल करियर्स‌’, ‘एआय करियर्स’ आदी विषयांवर परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. यावेळी न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष डॉ. भूषण केळकर, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे चीफ मेंटॉर विवेक सावंत, ‌माजी कुलगुरू अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ डॉ. अरविंद शाळिग्राम, एआय तज्ज्ञ अमेय पांगारकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत आदी सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com