

Ganesh and Sharayu Kandge From Nhavare Make Global Impact Through Engineering Excellence and Advanced Medical Technology Research
esakal
न्हावरे: अभियांत्रिकी क्षेत्रात चमत्कार करून जगातील सर्वात उंच पाळणा बनविण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या न्हावरे (ता.शिरूर जि.पुणे) येथील गणेश मारूती कांडगे यांच्या पत्नी शरयू गणेश कांडगे यांनीही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर संसाराची जबाबदारी सांभाळत आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच दुबई येथे जगातील सर्वात उंच तब्बल ८१५ फुट उंचीच्या पाळण्याची निर्मिती करण्यात आली आहे त्यामध्ये गणेश कांडगे यांचा मुख्य डिझायनर म्हणून सिंहाचा होता.