

Kamla Nehru Hospital
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) १० नवीन व्हेंटिलेटर आणि १० सीपीएपी मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील प्रस्ताव समितीसमोर सादर केला होता.