पर्यटनस्थळांवर ‘नाइट लाइफ’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

 पर्यटनस्थळांवरील ‘नाइट लाइफ’ अनुभवण्याकडे तरुण पर्यटकांचा कल वाढत आहे. हे चित्र फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश अशा पर्यटनाला चालना देणाऱ्या राज्यांमध्येही दिसते. यात तरुण पर्यटकांची संख्या सर्वाधिक असल्याचे निरीक्षण पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी नोंदविले.

पुणे - पर्यटनस्थळांवरील ‘नाइट लाइफ’ अनुभवण्याकडे तरुण पर्यटकांचा कल वाढत आहे. हे चित्र फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश अशा पर्यटनाला चालना देणाऱ्या राज्यांमध्येही दिसते. यात तरुण पर्यटकांची संख्या सर्वाधिक असल्याचे निरीक्षण पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी नोंदविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेगवेगळी पर्यटनस्थळे दिवसभर पाहायची आणि रात्री हॉटेलच्या वातानुकूलित रूममध्ये टीव्ही बघायचा, हा पर्यटनाचा कल आता वेगाने कालबाह्य होत आहे. शहरांमधील पर्यटनाबरोबरच तेथील ‘नाइट लाइफ’ अनुभवण्याकडे तरुण पर्यटकांचा भर वाढताना दिसतो. 

मुंबई रात्रभर सुरू ठेवण्याच्या निमित्ताने पर्यटनविश्‍वात याची चर्चा सुरू झाल्याचे दिसले.

राजस्थानच्या मारवाड भागातील जैसलमेरच्या किल्ल्यावर सोडलेले प्रकाशझोत रात्रीच्या गर्द अंधारात न्यहाळायचे असतात. तसेच, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाची विद्युतरोषणाई बघत तीनही समुद्रांची गाज ऐकत कन्याकुमारी मंदिराजवळ शांत बसणे, हे त्या पर्यटनस्थळांवरील ‘नाइट लाइफ’ आहे, असे मत आवर्जून पर्यटन क्षेत्रात काम करणारे मांडत आहेत. त्यातून तेथील पर्यटनाला चालना मिळाली.

राजस्थान, गुजरात आघाडीवर
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ अशा पर्यटनात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये पर्यटनातील ‘नाइट लाइफ’ या नव्या आयामाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वासही व्यक्त करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nightlife on tourist sites