Vaishnavi Hagwane Case : निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर जेसीबी प्रकरणात हगवणे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार?
Nilesh Chavan Judicial Custody : न्यायालयाने निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज त्याची पोलीस कोठडी संपणार होती. त्यामुळे त्याला पुन्हा न्यालयात हजर करण्यात आलं होतं.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने आज त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे १९ जूनपर्यंत तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.