
nilesh ghayval mother
esakal
निलेश घायवळ प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. पुण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर पोलिस निलेश घायवळचा शोध घेत आहेत. मात्र, निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याची माहिती मिळत आहे. त्याने खोटा व्हिसा तयार केल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात त्याचा भाऊ सचिन घायवळ देखील अडचणीत सापडला आहे. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याबाबत टीका होत आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळ यांना परवाना दिला होता. दरम्यान, आता निलेश घायवळचे आई-वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.