Nilesh ghaywal: नीलेश घायवळ टोळीने महिला उद्योजिकेकडून ४४ लाख उकळले, जीवे मारण्याची दिली धमकी, खंडणीचा धंदा उघड!

Nilesh Ghaywal and Sachin Ghaywal Accused of Extortion: नीलेश घायवळसह साथीदारांवर खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल ४४ लाख रुपये उकळले, व्यावसायिक महिलेला जीवे मारण्याची धमकी
Nilesh Ghaywal

Nilesh Ghaywal

esakal

Updated on

पुणे, ता. १८ ः कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपनीतील संचालक महिलेला धमकावून नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि साथीदारांनी ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घायवळसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालक महिलेने याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिने दिलेल्या फिर्यादीनुसार बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभी गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर, बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com