Nilesh Ghaywal Case : कोथरूड गोळीबारातील आरोपी नीलेश घायवळ लंडनमध्ये; न्यायालयात फरार घोषित!

Kothrud Firing : कोथरूड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ बनावट कागदपत्रांवर लंडनला पसार झाला असून न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केल्याने प्रत्यर्पण प्रक्रियेला गती मिळणार आहे.
Kothrud firing accused Nilesh Ghaywal declared fugitive

Kothrud firing accused Nilesh Ghaywal declared fugitive

sakal
Updated on

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पलायन केलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांना हा निकाल दिला. किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला होता. त्याने ९० दिवसांचा व्हिस्सा मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com