Baramati Accident: निंबूतजवळ भीषण मोटार अपघात; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Road Accident: नीरा-बारामती मार्गावरील निंबूत येथे मोटार अपघातात वडगाव निंबाळकरचा २१ वर्षीय आदित्य तानाजी चव्हाण ठार झाला. अपघातात सहप्रवासी जखमी झाला असून तपास सुरू असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
वडगाव निंबाळकर : नीरा- बारामती मार्गावर निंबूत (ता. बारामती) येथील मोटार अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.