Nimgaon Khandoba: निमगाव खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर! सोमवती अमावस्येला १ लाख भक्तांची हजेरी

Bhima River Royal Bath Draws Crowds at Nimgaon Khandoba Yatra: सोमवती अमावस्येला निमगाव खंडोबाच्या दर्शनासाठी लाखभर भाविकांची गर्दी
Somvati Amavasya Yatra at Nimgaon Khandoba Temple Draws One Lakh Devotees for Darshan and Traditional Royal Bath Ceremony

Somvati Amavasya Yatra at Nimgaon Khandoba Temple Draws One Lakh Devotees for Darshan and Traditional Royal Bath Ceremony

esakal

Updated on: 

दावडी : खेड तालुक्याचे श्रद्धास्थान आणि अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी झाली. दिवाळीच्या सुट्ट्यांची पर्वणी साधत राज्याच्या विविध भागांतून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे १ लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. टाळमृदंगाचा गजर, भंडाऱ्याची उधळण आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Loading content, please wait...