Pune Book Festival
Sakal
पुणे
Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाने गाठली नवी उंची! देशात दुसरा क्रमांक; यंदा वाचन, साहित्य अन् संस्कृतीचा संगम
Pune Book Festival Ranks Second Largest in India : वाचनसंस्कृतीचा उत्सव असलेला 'पुणे पुस्तक महोत्सव' आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महोत्सव ठरला असून, फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरदरम्यान या तिसऱ्या वर्षी ८०० हून अधिक स्टॉल्स आणि विविध भाषिक कार्यक्रमांसह 'जॉय ऑफ रीडिंग' हे खास आकर्षण असणार आहे.
पुणे : ‘‘वाचनसंस्कृतीचा उत्सव बनलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव ठरला आहे. यंदाच्या महोत्सवात ‘लिटरेरी फेस्ट’, ‘लेखक कट्टा’ आदी उपक्रम तर आहेच, त्याशिवाय ‘जॉय ऑफ रीडिंग हे वेगळेपण असेल. वाचन संस्कृतीशी घट्ट वीण असलेल्या पुणेकरांना वाचन, साहित्य आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवता येणार आहे’’, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष युवराज मलिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

