esakal | पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Swine-Flu

स्वाइन फ्लू आणि कोरोना यांची लक्षणे सारखीच आहेत. या दोन्ही आजारांबद्दल जनजागृती होत आहे. त्यामुळे या आजारांची लक्षणे दिसताच रुग्ण वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जातो. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने कमी होत आहे. यंदाही गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण कमी राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या नऊ रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून पुण्यातील हवामानात स्थिरावलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूंच्या संसर्गाने आठ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

शहर आणि परिसरात या वर्षी कमाल आणि किमान तापमानातील तफावत खूप मोठी नव्हती. त्यामुळे ‘एच१एन१’ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदविले.  

पुण्यात गेल्या ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या एक लाख ३५ हजार २१५ जणांची तपासणी केली. त्यापैकी स्वाइन फ्लूची शक्‍यता वाटणाऱ्या एक हजार १०३ रुग्णांना औषध दिले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ पैकी ९ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.

loading image
go to top