Nira Dam water
sakal
हिर्डोशी - जून महिना संपला तरी पावसाला सुरवात झाली नसल्याने भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणातील पाणी पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. मंगळवारी (ता. ३०) सकाळी भाटघर धरणात ७.७५ टक्के (१.८२ टीएमसी); तर नीरा देवघरमध्ये ८.९२ टक्के (१.०४ टीएमसी) पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धरणातील विसर्ग बंद आहे.