
बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांचे पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दाब वाढला. यामुळे लिमटेकजवळील नीरा डावा कालव्यात भगदाड पडले आहे.