
Pune University
पुणे - एकेकाळी ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवरील ‘राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क’ अहवालात यंदा मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट १०० संस्थांच्या क्रमवारीत गेल्यावर्षीपर्यंत (२०२४) ३७ व्या क्रमांकावर असणारे विद्यापीठ यंदा थेट ९१ व्या क्रमांकापर्यंत घसरले आहे. तर, देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठ ५६ व्या क्रमांकापर्यंत खाली आले आहे.